esakal | 'ज्या प्रॉपर्टीवर योगी बसलेत, ती जनता जप्त करु शकते'; प्रियांकांचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

'ज्या प्रॉपर्टीवर योगी बसलेत, ती जनता जप्त करु शकते'; प्रियांकांचा हल्लाबोल

'ज्या प्रॉपर्टीवर योगी बसलेत, ती जनता जप्त करु शकते'; प्रियांकांचा हल्लाबोल

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊ ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय शेरेबाजीला देखील उत आला आहे. काँग्रेस या निवडणुकीत कमबॅक करण्याची आशा धरुन आहे. तर भाजप सत्तेवर आपला वरचष्मा कायम राखण्यासाठी स्वत:ला तयार करतो आहे. आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्यांना सत्तेचा दुरुपयोग करत धमकावणे हा सर्वांत गंभीर गुन्हा असल्याची जोरदार टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या चुकीच्या कृत्याबद्दल प्रॉपर्टी जप्तीच्या ट्विटवर प्रियांका गांधी यांनी सडेतोड उत्तर देत हे ट्विट केलं आहे. (Priyanka Gandhi Vadra Property Yogi Adityanath is sitting belongs to people can be confiscated by them)

हेही वाचा: कंटेट अश्लील होता, पण त्याला पॉर्न म्हणता येणार नाही- राज कुंद्राचे वकील

योगी आदित्यनाथ यांनी काल बुधवारी ट्विट करत राज्यातील तरुणांना आवाहन केलंय की त्यांनी कुणाच्याही प्रभावाखाली येऊन स्वत:ची दिशाभूल करुन घेऊ नये. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, राज्यातील युवकांना माझी विनंती आहे की त्यांनी कुणाच्या प्रभावाखाली येऊ नये. आज कुणीही चुकीचं काम करु शकत नाही. ज्यांना आपली प्रॉपर्टी जप्त करायची असेल, त्यांनी चुकीचं कार्य करावं.

हेही वाचा: शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक पूल पाण्यात, जाणून घ्या स्थिती

योगी आदित्यनाथ यांचं हे ट्विट टॅग करत त्याला प्रत्युत्तरादाखल प्रियांका गांधी यांनी सडेतोड उत्तर देणारं ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, या देशात आपला आवाज उठवणे, निषेध करणे आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा एक संवैधानिक अधिकार आहे. योग्य मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्यांना भीती घालणे आणि त्यांना धमकावण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणे हा एक मोठा गंभीर अपराध आहे. ज्या 'प्रॉपर्टी'वर योगीजी बसले आहेत, ती त्यांची नाहीये. देशातील जनतेची आहे. लक्षात असुद्या की, ती 'प्रॉपर्टी' देखील जनता एक दिवस जप्त करु शकते.

loading image