esakal | कंटेट अश्लील होता, पण त्याला पॉर्न म्हणता येणार नाही- राज कुंद्राचे वकील
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kundra

कंटेट अश्लील होता, पण त्याला पॉर्न म्हणता येणार नाही- राज कुंद्राचे वकील

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अश्लील चित्रपटनिर्मिती आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सोमवारी अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू असून राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात समोर आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी सहा महिन्यांच्या तपासानंतर राज कुंद्रासह ११ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी आता राज कुंद्राच्या वकिलांचं स्टेटमेंट समोर आलंय. (raj kundra lawyer says content was vulgar but cannot be classified as adult content slv92)

'कंटेट अश्लील होता, पण त्याला पॉर्न या विभागात मोडलं जाऊ शकत नाही', असं राजचे वकील कोर्टात म्हणाले. राज कुंद्राने पॉर्नोग्राफिक कंटेट बनवल्याचा आरोपाला त्यांनी फेटाळलं. राजच्या अटकेबद्दल ते पुढे म्हणाले, 'अटकेशिवाय चौकशी करता येत नसेल तर अटक करणे योग्य आहे. परंतु या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यामुळे ही अटक कायद्याच्या अनुषंगाने नाही.'

हेही वाचा: राज कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून वापरला अभिनेता उमेश कामतचा फोटो

'शिल्पा शेट्टीचा थेट सहभाग आढळला नाही'

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अश्लील व्हिडीओ शूट करून हॉटशॉट्स या अॅपवर अपलोड केल्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची अद्याप कोणतीही सक्रिय भूमिका आढळली नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'पीडितांनी पुढे येऊन क्राइम ब्रांच मुंबईशी संपर्क साधावा. आम्ही योग्य ती कारवाई करू', असं मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे म्हणाले.

loading image