प्रियांका आणि शेख हसीना यांची गळाभेट ठरतेय चर्चेचा विषय

वृत्तसंस्था
Monday, 7 October 2019

शेख हसीना यांची रविवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गळाभेट घेतली. या प्रेमभरल्या भेटीचे छायाचित्र प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर झळकाविले असून, त्याला असंख्य नेटकऱ्यांनी मनापासून दाद दिली. 

नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी शेख हसीना यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गळाभेट घेतली. या प्रेमभरल्या भेटीचे छायाचित्र प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर झळकाविले असून, त्याला असंख्य नेटकऱ्यांनी मनापासून दाद दिली. 

प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, प्रदीर्घ काळानंतर शेख हसीना यांच्याशी भेट झाली. आपल्या ध्येयासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. त्यात वैयक्तिक नुकसानही झाले; पण त्यांनी हार मानली नाही. त्यांची हीच धडाडी माझ्यासाठी प्रेरणास्रोत ठरली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली.

भारताचे बांगलादेशसोबत उत्तम संबंध आहेतच; पण शेख हसीनांच्या प्रयत्नांमुळे त्यांना यापुढील काळात नवीन आयाम मिळणार आहे, असे बांगलादेशच्या प्रवक्त्यानेही म्हटले होते.सोनिया गांधींशी चर्चाबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी दिल्लीत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन्ही देशांशी संबंधित मुद्यांवर या दोन नेत्यांशी शेख हसीना यांनी चर्चा केली. यावेळी काँग्रेस नेते आनंद शर्मा व प्रियांका गांधी यांचीदेखील उपस्थिती होती. 

बॉर्डर हाट्‌स उभारणीवर मतैक्‍य 
भारत-बांगलादेश सीमेवर 12 बॉर्डर हाट्‌स उभारण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांच्यात मतैक्‍य झाले. सीमावर्ती प्रदेशातील दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सुटावा म्हणून दोन्ही देशांनी यासाठी पुढाकार घेतला असून, तसे संयुक्त निवेदनदेखील प्रसिद्ध केले जाणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka gandhis overdue hug bangladeshs prime ministar sheikh hasina