लॉकडाउनमुळे अनेकांच्या झोपेचे खोबरे; निद्रानाशाबरोबरच मानसिक समस्याही वाढल्या 

लॉकडाउनमुळे अनेकांच्या झोपेचे खोबरे; निद्रानाशाबरोबरच मानसिक समस्याही वाढल्या 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आल्याने तरुणांपासून ते लहानथोरांपर्यंत सगळेचजण घरात अडकून पडले आहेत. एरवी रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरणाऱ्या तरुणाईलाही चार भिंतीत कोंडून घ्यावे लागत आहे. अशा स्थितीत ही मंडळी सोशल मीडियाच्या आहारी गेली नसती तरच नवल. जुन्या मालिका, वेब सीरिज, ऑनलाईन गेम्स, आणि व्हिडिओ चॅटिंग यामुळे त्यांच्या झोपेचे पार खोबरे झाले आहे. लॉकडाउनच्या नवव्या आठवड्याला सामोरे जाणारी मंडळी आता विविध आरोग्यविषयक समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येते. सतत स्क्रीनसमोर बसून राहणाऱ्या मंडळींना ताण तणाव आणि निद्रानाशासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून अनेकांच्या झोपेचे चक्रच बिघडले असल्याचे वैद्यकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

म्हणून झोप उडाली 
- नोकरीचे कसे होणार? 
- भविष्यात पैसे पुरतील का? 
- मला आजार तर होणार नाही ना? 
- कार्यालयाचे काम वेळेत कसे पूर्ण करू? 
 
तेव्हापासून समस्या वाढल्या 
लॉकडाउन लागल्यापासून लोकांच्या झोपेच्या समस्या देखील वाढल्याचे बंगळूरमधील एका वैद्यकीय संस्थेने म्हटले आहे. लॉकडाउनमुळे बहुसंख्य लोकांना घरून काम करावे लागत असले तरीसुद्धा त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावते आहे असे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या पाहणीमध्ये तब्बल दीड हजार लोकांनी सहभाग घेतला होता त्यातील ४४ टक्के लोकांनी लॉकडाउन झाल्यापासून आम्ही सहा तासांपेक्षाही कमी झोप घेतल्याचे सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

२५ मार्च आधी झोपेच्या समस्या असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे २६ टक्क्यांपेक्षाही कमी होते असे बंगळूरमधील स्लीप सोल्युशन या संस्थेने म्हटले आहे. एकीकडे काही लोकांची झोप कमी झाली आहे तर दुसरीकडे काहींना जास्त वेळ झोपण्याचा आजार जडला आहे. 

हे करा 
- योगासने 
- शारीरिक व्यायाम 
- संगीत ऐकणे 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झोपण्यापूर्वी हे नको 
- मोबाईल पाहणे 
- लॅपटॉपवरील काम 
- कोला, अल्कोहोलचे सेवन 
- कॉफी आणि चहाचे सेवन 

रात्री अंथरुणात गेल्यानंतर देखील तुम्हाला झोप लागत नसेल तर पुस्तक वाचा, काही हलक्या क्रिया करा, ज्यामुळे तुम्हाला निवांतपणा वाटेल. 
विवेक नानगिया, वैद्यकीय चिकित्सक, फोर्टिस. रुग्णालय दिल्ली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com