esakal | कोरोनाच्या संसर्गानंतर रुग्णांमध्ये ॲंटिबॉडिजची ११ महिन्यांनंतरही निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

Testing

कोरोनाच्या संसर्गानंतर रुग्णांमध्ये ॲंटिबॉडिजची ११ महिन्यांनंतरही निर्मिती

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनाचा (Corona) सौम्य संसर्ग होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आता, अशा व्यक्तींसाठी चांगली बातमी (Good News) आहे. कोरोनाच्या सौम्य संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये पुढील कित्येक महिने रोगप्रतिकार पेशींकडून प्रतिपिंडे (ॲंटिबॉडिज) (Antibodies) तयार होत असल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय संशोधनात (International Research) करण्यात आला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्याचे निष्कर्ष ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. (Production of Antibodies in Patients after Corona Infection even after 11 months)

कोरोनाच्या सौम्य संसर्गानंतर पेशींकडून आयुष्यभर प्रतिपिंडांची निर्मिती होऊ शकते, असा दावाही संशोधकांनी केला आहे. त्यमुळे, अशा रुग्णांना दीर्घकाळ प्रतिपंडांचे संरक्षण मिळत असल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याची शक्यता कमी असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. सहाय्यक प्रा. अली एलेबेडी त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रतिपिंडांच्या प्रकल्पावर काम करीत आहेत. संशोधकांनी कोरोना झालेल्या ७७ रुग्णांकडून संसर्गानंतर एक महिन्यांनंतर तसेच तीन महिन्यांनंतर रक्ताचे नमुने घेतले. यापैकी बहुतेकांना कोरोनाचा सौम्य संसर्ग झाला होता. केवळ सहा जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या रुग्णांच्या अस्थीमज्जेची (बोनमॅरो) कोरोना न झालेल्या व्यक्तीच्या अस्थीमज्जेशी तुलना करण्यात आली. त्यावेळी, कोरोना रुग्णांच्या अस्थीमज्जेत संसर्गाच्या ११ महिन्यांनंतरही प्रतिपिंडे तयर होत असल्याचे आढळले.

हेही वाचा: काँग्रेस आक्रमक; ट्विटरकडे पत्र पाठवून 11 मंत्र्यांवर कारवाईची मागणी

प्रतिपिंडांची निर्मिती कशी होते?

कोरोना संसर्गादरम्यान प्रतिपिंडे निर्माण करणाऱ्या पेशींचा वेगाने गुणाकार होतो व त्यांचे रक्तात अभिसरण होते. त्यातूनच, प्रतिपिंडांचे प्रमाण खूप वाढते. संसर्गाची तीव्रता संपल्यानंतर बहुतेक पेशींचा मृत्यू होऊन रक्तातील प्रतिपिंडांचे प्रमाण घटते. मात्र, त्यानंतरही उर्वरित दीर्घायुष्य लाभलेल्या प्लाझमा पेशी अस्थीमज्जेत (बोनमॅरो) प्रवेश करतात. तिथेच स्थिरावतात. या पेशी अस्थीमज्जेतून सातत्याने कमी प्रमाणात प्रतिपिंडे रक्तप्रवाहात सोडतात. त्यातूनच भविष्यात विषाणुपासून संरक्षण मिळते, असे संशोधकांचे मत आहे.

संशोधकांना कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या शरीरात ११ महिन्यांनंतरही प्रतिपिंडे बनविणाऱ्या पेशी आढळल्या. या पेशी कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या उर्वरित आयुष्यातही प्रतिपिंडांची निर्मिती करत राहतील. कोरोनाच्या संसर्गानंतरच्या दीर्घकालिन प्रतिकारशक्तीचा हाच पुरावा आहे.

- प्रा. अली एलेबेडी, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन, अमेरिका