‘काँग्रेस प्रोफेशनल’ तरुणी एका ट्विटचे घेते ५०० रुपये? ट्विटरवर 500LeRiaHai ट्रेंड

टीम ई-सकाळ
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मुंबई : ट्विटरवर आज, दिवसभरात एक ट्रेंड सुरू होता. #500LeRiaHai या ट्रेंडकडं सगळ्यांच लक्ष वेधलं होतं. काँग्रेसची एक दक्षिण मुंबईतील सोशल मीडियाव ऍक्टिविस्ट अँड्रिया डिसुझा हिच्या एका ट्विटमुळे ट्विटरवर हा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यावर अँड्रियाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, तिला ट्रोल केलं जात असल्याचं दिसत आहे.

मुंबई : ट्विटरवर आज, दिवसभरात एक ट्रेंड सुरू होता. #500LeRiaHai या ट्रेंडकडं सगळ्यांच लक्ष वेधलं होतं. काँग्रेसची एक दक्षिण मुंबईतील सोशल मीडियाव ऍक्टिविस्ट ड्रिया डिसुझा हिच्या एका ट्विटमुळे ट्विटरवर हा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यावर अँड्रियाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, तिला ट्रोल केलं जात असल्याचं दिसत आहे.

शिवसेना प्रवेशावर अखेर उर्मिला बोलली!

असा सुरू झाला ट्रेंड
अँड्रिया डिसुझा ही काँग्रेसच्या ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसची सोशल मीडियावरची सक्रीय सदस्य आहे. तेजिंदर पाल सिंग बग्गा या तरुणाने अँड्रियासोबतचे एक चॅट व्हायरल करून तिचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात अँड्रियाने फ्लिपकार्टच्या सेल संदर्भात एका ट्विटसाठी पाचशे रुपये घेतल्याचे म्हटले आहे. यावरून काँग्रेसची सक्रीय कार्यकर्ती एका ट्विटसाठी ५०० रुपये घेत असल्याची चर्चा ट्विटरवर सुरू झाली आहे. opindia या वेबसाईटने बग्गा यांच्या ट्विटनंतर एक वृत्त प्रसिद्ध केले. त्यावरही नेटिझन्सच्या उड्या पडल्या. त्यामुळे अँड्रिया या नावातील रिया शब्दाला ‘ले रिया है’ (#500LeRiaHai) असा ट्विटर ट्रेंड सुरू झाला.

तेजिंदर बग्गाला टोला
अँड्रियानं याची दखल घेत, खुलासा करण्याचा प्रयत्न केला. संबंधित चॅट हे माझ्या सोशल मीडिया मॅनेजरचं असल्याचं म्हणणं अँड्रियानं मांडलंय. अर्थात त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी तुम्ही ट्विटरवर एक वेगळा विषय आणला, याबद्दल तुमचे विशेष आभार, असा टोला अँड्रियानं तेजिंदर बग्गा याला लगावलाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: professional congress person take 500 for each tweet promotion