शिवसेना प्रवेशावर अखेर उर्मिला बोलली!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिली मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि उर्मिला यांची भेट झाल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. त्यावर उर्मिलाने खुलासा केला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिली मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि उर्मिला यांची भेट झाल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. त्यावर उर्मिलाने खुलासा केला आहे.

उर्मिली मातोंडकर करणार ‘या’ पक्षात प्रवेश!

काय म्हणाल्या उर्मिला?
मीडियाने ऐकीव माहितीवर काही बातम्या शेअर करू नयेत, असं उर्मिला यांनी म्हटलंय. त्यांनी म्हटले आहे की, मी कोणताही राजकीय पक्ष जॉईन करणार नाही. त्यामुळे माझी मीडियाला विनंती आहे की, त्यांनी खात्री केल्याशिवाय याविषयी ऐकीव माहितीवर काहीही शेअर करू नये. असे करणे माझ्याबाबतीत आणि त्या संबंधित पक्षाच्या बाबतीत चुकीचे आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना-भाजपमध्ये राडा

ठाकरे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध
उर्मिला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीनंतर उर्मिलाच्या शिवसेनाप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये असताना उर्मिला मार्तोंडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. मात्र, ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या संबधामुळे शिवसेनेवर त्यांनी एक शब्दही टिका केली नव्हती. 'मातोश्री'नेही उर्मिला मातोंडकर यांच्याशी मराठी लेक म्हणूनच मैत्रीचे संबध कायम ठेवले होते. नार्वेकर यांच्याशी झालेली भेट ही राजकीय भेट नव्हती. ठाकरे कुटुंबाशी असलेल्या संबंधांमुळे ही भेट घडल्याचे आणि चर्चा झाल्याचे नार्वेकर यांनी सांगितले होते.

मराठी कलाकार खड्ड्यांवर भडकले; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी
उर्मिला यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपले स्पष्ट विचार व्यक्त करत त्यांनी वाहव्वाही मिळवली होती. पण, मुंबई उत्तरमध्ये त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी पराभव केला. पराभवापूर्वीच उर्मिला यांनी मुंबई काँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदांची तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. तसेच तात्कालीन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना एक पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करत त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not Joining Any Other Party, Urmila Matondkar reacts amid Sena Buzz