Prophet controversy: Protesters hurled stones and police used tear gas canisters
Prophet controversy: Protesters hurled stones and police used tear gas canistersProphet controversy: Protesters hurled stones and police used tear gas canisters

आंदोलकांची दगडफेक तर पोलिसांना केला अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याला लागून असलेल्या हावडा येथील पांचाला बाजारात पैगंबर वादावरून (Prophet controversy) पोलिस आणि आंदोलकांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी समाजकंटकांनी दगडफेक (hurled stones) केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा (tear gas canisters) वापर केला. कालही भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा आणि भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नवीन कुमार जिंदाल यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात शहरातील काही भागात निदर्शने करण्यात आली होती. (Protesters hurled stones and police used tear gas canisters)

प्रशासनाने १५ जून २०२२ पर्यंत शहरात तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. शुक्रवारी देखील हावडा जिल्ह्यातील विविध ठिकाणी बदमाशांनी पंचाला भागात दगडफेक केली होती आणि रस्ते आणि रेल्वे ट्रॅक अडवले होते. खबरदारीचे पाऊल उचलत राज्य सरकारने हावडा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शुक्रवारी सायंकाळी बंद केली होती.

परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी (Police) हावडामधील सलाप आणि उलुबेरियामधील ब्लॉक केलेले रस्ते मोकळे केले आहेत. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग सहाची नाकेबंदी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा धुलागढ, पांचाला आणि उलुबेरिया येथे पोलिसांशी झटापट झाली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Prophet controversy: Protesters hurled stones and police used tear gas canisters
नागपूर : भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

धार्मिक भावना (Prophet controversy) दुखावणारी टिप्पणी केल्याबद्दल भाजपच्या दोन नेत्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे एका आंदोलकाने सांगितले. धुलागड आणि पाचला येथे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. जिथे आंदोलकांनी प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली आणि जवळपास उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com