अद्ययावत मतदार यादी द्या, अन्यथा; अखिलेश यांचा निवडणूक आयोगाला इशारा | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अद्ययावत मतदार यादी द्या, अन्यथा; अखिलेश यांचा निवडणूक आयोगाला इशारा
अद्ययावत मतदार यादी द्या, अन्यथा; अखिलेश यांचा निवडणूक आयोगाला इशारा

अद्ययावत मतदार यादी द्या, अन्यथा; अखिलेश यांचा निवडणूक आयोगाला इशारा

लखनौ - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आमनेसामने आले होते. उत्तर प्रदेशात विरोधी पक्ष विरुद्ध आयोग यांच्यातील वादाची पहिली ठिणगी पडली आहे. निवडणुकीपूर्वी आयोगाकडून अद्ययावत केलेली मतदार यादी मिळाली नाही तर धरणे आंदोलन करू असा इशारा समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव यांनी दिला.

ही यादी पुढील वर्षी पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर तातडीने ती मिळावी अशी सपाची मागणी आहे.

हेही वाचा: जम्मू काश्मीर: सुरक्षा यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये; CRPF च्या 5 तुकड्या रवाना

आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आयोगाला निवेदन दिले आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. आयोग निपक्षपातीपणे वागेल अशी आशा आहे, असे सांगून अखिलेश म्हणाले की, २०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदार यादी पक्षांना दिली जायची, पण यावेळी हे का करण्यात आले नाही...आपले सरकार राज्यातून हटविण्यास लोक सज्ज झाल्याचे भाजपला कळून चुकले आहे. आयोगाचे बहुतांश अधिकारी उत्तर प्रदेशातील आहेत.

इतके घातले, इतके काढले....

निवडणूक आयोगावर तोफ डागण्यासाठी अखिलेश पुरेपूर तयारी करूनच पत्रकार परिषदेला आले होते. ते म्हणाले की, यादीत २१,५६,२६२ नावांची भर घालण्यात आली आहे, तर १६,४२,७५६ नावे काढून टाकण्यात आली आहेत. यापूर्वी नावांची भर घालणे व नावे वगळणे या प्रक्रियेनंतर आयोग यादी जाहीर करायचा. यावेळी मात्र कुणाच्या दडपणाखाली हे केले जात नाही हे आम्हाला कळायला मार्ग नाही. एक राजकीय पक्ष या नात्याने कुणाची नावे काढली आणि कुणाची घातली हे आम्हाला कळायला हवे, पण आम्हाला काहीच माहिती मिळालेली नाही.

Web Title: Provide Updated Voter List Akhilesh Yadav Warns Election Commission Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top