
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलेत यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या एका हेड कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलीय. पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेत पेपर लीक प्रकरणी ही कारवाई केलीय. राजस्थानमध्ये २०२१ मध्ये झालेल्या भरती परीक्षेचा पेपर लीक झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत १२० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आलीय. यात ५४ ट्रेनी पोलीस उपनिरीक्षकसुद्धा आहेत.