esakal | पबजी बेतला तरुणाच्या जीवावर!
sakal

बोलून बातमी शोधा

पबजी बेतला तरुणाच्या जीवावर!

हैदराबाद येथील 19 वर्षीय तरूणाला पबजी या ऑनलाइन गेमचे व्यसन महाग पडले असून त्याच्या मेंदूत गुठळ्या झाल्याने गंभीर स्थिती ओढावली आहे.

पबजी बेतला तरुणाच्या जीवावर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : सध्या ऑनलाइन गेम्सचे बळी दिवसेंदिस वाढत आहेत. ब्ल्यू व्हेल, मोमो चॅलेन्ज यासारख्या ऑनलाइन गेममुळे जगभरातील अनेक तरूण आणि लहान मुलांचा जीव गेला असून सध्या पबजी या गेमने सर्व तरूणांसह लहानग्याना वेड लावले आहे.

दरम्यान हैदराबाद येथे पबजी हा गेम एका 19 वर्षीय तरूणाच्या जिवावर बेतला आहे. सतत गेम खेळल्याने त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने त्याची स्थिती गंभीर झाली आहे. संबधित तरूण हा तेलंगणा येथील वनापर्थीचा राहणारा असून तो बीएससीच्या दुस-या वर्षात शिकत होता.

काही दिवसांपूर्वी अचानक त्याचे वजन कमी होऊ लागले व मानसिक तणावामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा त्रास त्याला सतत पबजी गेम खेळल्याने झाला असल्याचे निदान डॅाक्टरांनी केले. सततच्या खेळामुळे त्याला पबजीचे व्यसनच लागले होते. त्याचा उजवा हात व पाय काम करणे बंद झाले.

तसेच सर्व लक्ष गेमवर असल्याने तो खाण्या-पिण्यासह झोपण्याकडेही दुर्लक्ष होत असे. यामुळे त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या असल्याचे डॅाक्टरांचे मत आहे. 
सध्या पबजी हा गेम सर्वत्र खेळला जात असून  मोठ्या प्रमाणात लहान व तरूण मुले या गेमच्या आहारी गेले आहेत.

loading image
go to top