US से आया हमारा दोस्त; टिकरी बॉर्डरवरील शेतकऱ्यांवर करतोय मोफत उपचार!

Dr_Swaiman_Singh
Dr_Swaiman_Singh

Farmers Protest: नवी दिल्ली : दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन देशभरातच नाही, तर जगभरात चर्चेचा विषय ठरलं. हॉलिवूडमधील तसेच जागतिक स्तरावरील अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनाची दखल घेतली. परदेशात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या अनेक भारतीयांनीही आपापल्या परीने आंदोलनात पाठिंबा दर्शविला. असाच एक अमेरिकेतला डॉक्टर आपल्या अन्नदात्याच्या मदतीला धावून आला आहे. 

हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या या डॉक्टरचं नाव आहे सवाईमान सिंह. शेतकरी आंदोलनादरम्यान टिकरी बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर ते मोफत वैद्यकीय उपचार करत आहेत. या ठिकाणी त्यांचं मन एवढं रमून गेलं की त्यांनी न्यू जर्सीला परत जाण्याचा निर्णय रद्द केला आहे. 

मोफत उपचार
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या १०० दिवसांहून अधिक काळापासून राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आणि तेव्हापासूनच डॉ. सिंह टिकरी बॉर्डरवरील आंदोलनकर्त्यांवर मोफत उपचार करत आहेत. तसेच औषधेही मोफत देत आहेत. 

या डॉक्टर साहेबांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्याचं आणखी एक कारण म्हणजे ते फक्त शेतकरी आंदोलकांवरच नाही, तर स्थानिक नागरिक, पोलिस कर्मचारी तसेच सीआरपीएफच्या जवानांवर उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांनी टिकरी बॉर्डरवर मेडिकल कॅम्प सुरू केला असून २४x७ सुरू असणाऱ्या या कॅम्पमध्ये सुमारे ४ ते ६ हजार लोक या मोफत सेवेचा लाभ घेतात. तसेच आपत्कालीन वेळेतही ते आपली सेवा पुरवत आहेत. टिकरीवर सध्या डॉ. सिंह यांचं एकमेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे.

अमेरिकेला बाय बाय
आम्ही दरवर्षी अशा प्रकारचे कॅम्प करतो. एका पेशंटना आंदोलनावेळी हार्ट अॅटॅक आल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे मी या ठिकाणी आलो. आणखी काही दिवस इथंच थांबावं असं वाटल्याने मी डॉक्टरांच्या टीमने मेडिकल कॅम्प सुरू केला. आता अमेरिकेला जाऊ वाटत नाहीय. इथंच आम्ही सेवा बजावू, असं डॉ. सिंह म्हणतात. 

हे माझं कर्तव्य
डॉ. सिंह पुढे म्हणाले, पैसे कमावणं ही माझ्यासाठी मोठी समस्या नव्हती. देवाच्या कृपेमुळे मी एका चांगल्या कुटुंबात जन्मलो. आयुष्यात एकवेळ अशी येते की, जेव्हा स्वत:पेक्षा इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होते. त्यामुळे मी डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. लोकांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. १० हजार लोकांच्या आश्रयाची तसेच वाचनासाठी लायब्ररीही येथे सुरू करण्यात आली आहे. 

 - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com