प्रवाशांसाठी खूशखबर, मुंबईसाठी धावणार पूजा स्पेशल ट्रेन

Opposition of Konkan people to express railway passenger trains
Opposition of Konkan people to express railway passenger trains
Updated on

दिवाळीसाठी मुंबईहून राज्याबाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याचसोबत राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांची संख्याही वाढली आहे. सणांसाठी विशेष रेल्वेने जाण्याचा मानस असेल तर केंद्र सरकारने पूजा एक्सप्रेसची घोषणा केली आहे.

दिवाळी आणि पूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना अतिरिक्त गर्दीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे रेल्वेकडून फेस्टिव्हल स्पेशल गाड्या चालवण्यात येत आहेत. यासाठी पूर्वोत्तर रेल्वे (North Eastern Railway) ते बिहार आणि मुंबईसाठी पूजा स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही शहरांसाठी ही ट्रेन असणार आहे.

ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, बरौनी ते लोकमान्य टिळक टर्मिनस पूजा विशेष ट्रेन (05298) 13 नोव्हेंबरला धावणार असल्याची माहिती दिली. ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15 नोव्हेंबर, सोमवार रोजी धावेल. या ट्रेनमधील सर्व डबे आरक्षित वर्गाचे असतील आणि त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोविड-19 च्या नियमांचे पालन करावे लागेल.

05297 बरौनी - लोकमान्य टिळक टर्मिनस पूजा विशेष ट्रेन 13 नोव्हेंबर 2021 रोजी बरौनी येथून 16.30 वाजता समस्तीपूर येथून 17.35 वाजता, मुझफ्फरपूर 18.30 वाजता, हाजीपूर 19.25 वाजता सुटेल. किसऱ्या दिवशी भुसावळ येथून 01.30 वाजता नाशिकरोड येथून 05.30 वाजता, इगतपुरी येथून 06.20 वाजता आणि कल्याण येथून 08.48 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 10.00 वाजता पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com