'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार

वृत्तसंस्था
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार राजा सिंह यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे.

राजा सिंह म्हणाले, 'सानिया मिर्झा हिने पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक याच्याशी विवाह केला आहे. यामुळे ती काहीही बोलली तरी ती आता पाकिस्तानची सून आहे. तिला तेलंगणच्या सदिच्छा दूत पदावरून हाकलण्यात यावे आणि तिच्या जागी सायना किंवा पी. व्ही. सिंधू यांना हे पद देण्यात यावे.'

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सानिया मिर्झा हिने ट्विट केले होते. त्यामध्ये म्हटले होते की, 'मी देशभक्त आहे हे वाटण्यासाठी मला सोशल मीडियाची गरज नसल्याचे म्हटले होते. तसेच ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना हे वाटते आहे की मी हल्ल्याचा निषेध करणारी पोस्ट केली पाहिजे, कारण आम्ही सेलिब्रिटी आहोत. मात्र, मला तशी गरज वाटत नाही.' तिच्या ट्विटनंतर ती ट्रोलही झाली होती.

दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले आहेत. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राजा सिंग यांनी सानिया मिर्झाला सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama Terror Attack : bjp mla t raja singh calls sania mirza pakistans bahu