पुलवामा हल्ल्याबाबत आता नवी माहिती समोर; हल्लेखोराने...

वृत्तसंस्था
शनिवार, 7 मार्च 2020

बॅटरी, रसायनांची खरेदी

नवी दिल्ली : पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) याप्रकरणाचा तपास केला जात आहे. त्यानंतर आता यातील धक्कादायक बाब समोर आली आहे. हल्लेखोराने आयईडी बनविण्यासाठी लागणाऱ्या रसायनांची ऑनलाईन खरेदी केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मागील वर्षी 14 फेब्रुवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 40 जवान हुतात्मा झाले होते. एका आत्मघाती हल्लेखोराने बॉम्बस्फोटांनी भरलेली एक कार सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून स्फोट घडविला होता. त्यानंतर आता एनआयएने याप्रकरणाचा तपास पुन्हा एकदा सुरु केला आहे. त्यानुसार, श्रीनगरमधून बाग-ए-मेहताब परिसरात वजीर-उल-इस्लाम आणि पुलवामातील हकरीपुरा गावातील मोहम्मद अब्बास राठेर याला अटक करण्यात आली. त्यामुळे आता याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 5 झाली आहे.

Image result for pulwama attack

अटकेत असलेल्या एकाने आयईडी बनवण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करून आयईडीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी केली. यातील महत्त्वाची बाब म्हणजे ही खरेदी शॉपिंग साईट ऍमेझॉनवरून करण्यात आली होती. 

बॅटरी, रसायनांची खरेदी

जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना आयईडी बनवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार रसायन, बॅटरीसारख्या इतर गोष्टींचा वापर झाला. मात्र, हे सर्व साहित्य ऍमेझॉन या शॉपिंग साईटवरून खरेदी करण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama terror attack Srinagar boy bought chemicals for making bomb from Amazon