Pulwama attack: पुलवामा हल्ल्याला 2 वर्षे पूर्ण; अनुत्तरित राहिलेले काही प्रश्न

pulwama
pulwama

नवी दिल्ली- पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. पण अजूनही भारतीयांमध्ये असलेला संताप संपलेला नाही. भारतीय जवानांनी दिलेलं बलिदान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातील पाणी अजूनही सुकलेलं नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले होते. 

14 फेब्रुवारी हा दिवस काही लोक व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतात. प्रेमी युगुलांवर या दिवशी प्रेमाची भुरळ पडलेली असते. पण, 2019 मध्ये काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रक्तरंजीत खेळ खेळला होता. भारतीय जवानांच्या गाडीचा ताफा आपल्या मार्गाने जात होता. दुपारी जवळपास साडेतीन वाजले होते. अशावेळी जम्मू-काश्मीर हायवेवर 2500 जवानांना घेऊन जाणाऱ्या 78 गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. 

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली'...

जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने विस्फोटकाने भरलेली कार जवानांच्या ताफ्याला नेऊन धडकवली. त्यानंतर भयानक स्फोट झाला आणि बसच्या चिंधड्या उडाल्या. परिणामी भारत देशाचे 40 शूर जवान हकनाक शहीद झाले. अनेक जवान जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या या हल्ल्याची जखम आजही भळभळती आहे. भारताने याचा बदला घेतला असला, तरी देशाच्या जवानांचे बलिदान देश विसरु शकणार नाही. 

जैशने केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली. व्हॅलेंटाईन डेचा उत्सव साजरा करणारा देश, जवानांवरील हल्ल्याच्या दु:खात बुडाला. अनेकांनी व्हॅलेंटाईनचा आनंद दूर लोटला. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आणि धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली. अखेर भारत सरकारने चुपचाप शहीदांवरील हल्ल्याचा बदला घेतला. 

पुलवामावर झालेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर म्हणजे 26 फेब्रुवारीला भारतीय एअर फोर्सने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईल केला आणि दहशतवाद्यांचे अनेक ठिकाणे उद्धवस्त केले. भारताच्या 40 जवानांच्या बदल्यात एअर फोर्सने जवळपास 300 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारताशी पंगा घेणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, हेच लष्कराने दाखवून दिले होते. 

'रामाच्या देशात रामाचे नाव घेतल्यानं होणारी हत्या, मन हेलावलं'

पुलवामा हल्ल्यासंबंधी अनुत्तरीत राहिलेले काही प्रश्न...

कार आणि स्फोटकांची व्यवस्था कशी झाली?

हल्ल्यासाठी Maruti Eeco कार वापरण्यात आली होती कार पहिल्यांदा 2011 मध्ये मुद्दसीर खान याला विकण्यात आली. त्यानंतर तब्बल 7 वेळा कार विकण्यात आली. शेवटी कार सज्जाद भट याच्या मालकीची होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये 25 किलो आरडीएक्स होते. पण, इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कोठून आले याचा पता लागलेला नाही. 

देविंदर सिंगचा यात सहभाग होता का?

पुलवामा हल्ल्याप्रकरणी डीएसपी देविंदर सिंग याला अटक करण्यात आली होती. देविंदरने 2017 मध्ये तीन दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. देविंदरची पुलवामा हल्लात काय भूमिका होती, याबाबत उत्तर मिळालेलं नाही.

पुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेचे अपयश?

पुलवामासारख्या मोठा हल्ला होणे आणि याचा काहीही सुगावा नसणे गुप्तचर यंत्रणेचे अपयश मानले जाते. माहितीनुसार हल्ल्यापूर्वी काही सूचना मिळाल्या होत्या,पण कारच्या माध्यमातून हल्ला होईल अशा स्पष्ट सूचना मिळाल्या नव्हत्या. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com