पुणे इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू; PM मोदींनी व्यक्त केला शोक

An under-construction building collapsed in Yerwada, Pune
An under-construction building collapsed in Yerwada, PuneSakal Digital
Summary

दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे.

नवी दिल्ली - येरवड्यातील (Yerwada) शास्त्रीनगर भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (Building Collapse) दुर्घटना गुरुवारी रात्री घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पुण्यातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे दु:ख झालं. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना. आशा आहे की यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ब्ल्यू ग्रास अलुवलीया या कंपनीचे वाडिया बंगला परिसरात नोप्रोनिया नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी या लोखंडी जाळीवर वरच्या बाजूने आठ व खालच्या बाजूने आठ कामगार काम करत होते. ही जाळी अचानक कोसळल्याने 6 कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी म्हणाले की, आपण घटनास्थळी असून किमान पाच ते सहा कामगारांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.

An under-construction building collapsed in Yerwada, Pune
पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, 6 जणांचा मृत्यू

रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्वरित पोलिस घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे. स्लॅब नेमका कशामुळे कोसळला व कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली होती का नाही? याचा तपास सुरू असल्याचं येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com