Tribal Women : आदिवासी महिलांना ‘दंडवत परिक्रमे’ची शिक्षा

राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोग चौकशी करणार; तृणमूल काँग्रेसवर आरोप
Tribal Women Dandavat Parikrama
Tribal Women Dandavat Parikrama sakal

नवी दिल्ली : भाजपमध्ये प्रवेश केल्याचा राग आल्याने शिक्षा म्हणून काही आदिवासी महिलांना ‘दंडवत परिक्रमा’ करण्यास तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोग (एनसीएसटी) करणार आहे. एनसीएसटीने पश्‍चिम बंगाल पोलिसांना नोटीस बजावून या प्रकरणाचा तपास अहवाल मागवला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी यासंदर्भात आयोगाला दोन दिवसांपूर्वी पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या पत्रात तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांवर आरोप करण्यात आले . भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आदिवासी महिलांना शिक्षा म्हणून दंडवत परिक्रमा करायला लावली आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने तृणमूल काँग्रेसमध्ये सामील करून घेतल्याचे म्हटले आहे.

‘एनसीएसटी’ने काल पश्‍चिम बंगालचे पोलीस प्रमुख मनोज मालविय यांना नोटीस बजावली आणि त्यात आयोगाने या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे म्हटले आहे. तीन दिवसांच्या आत कारवाई अहवाल द्यावा, अशी सूचनाही केली आहे. जर पोलिस प्रमुख वेळेत उत्तर देत नसतील तर त्यांना व्यक्तिश: हजर राहण्याबाबत समन्स बजावले जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.

मजुमदार यांनी म्हटले, की बालुरघाट लोकसभा मतदारसंघातील आदिवासी कुटुंबातील सुमारे २०० जण ६ एप्रिल रोजी भाजपमध्ये दाखल झाले. ही बाब तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना रुचली नाही. तृणमूलच्या ‘गुंडां’नी त्यांच्यावर आणि कुटुंबावर दबाव टाकला आणि त्यापैकी काही जणांना तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी प्रवृत्त केले.

भाजपने केलेल्या आरोपानुसार, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी तापन गोफानगरच्या चार नागरिकांना जबरदस्तीने दंडवत परिक्रमा करायला लावली. भाजपमध्ये प्रवेश केल्याची शिक्षा म्हणून त्यांना एक किलोमीटरपयंत दंडवत परिक्रमा घालण्यासाठी प्रवृत्त केले. या शिक्षेतून तृणमूल नेत्यांची मध्ययुगीन मानसिकता दिसून येते, असेही त्यांनी म्हटले आहे.

दंडवत परिक्रमा केल्यानंतर या आदिवासी महिलांना जिल्हा पक्ष कार्यालयात तृणमूल काँग्रेसचा झेंडा दिला. यासंदर्भात मजूमदार यांनी ट्विटरवर व्हिडिओ जारी करत म्हटले, की तृणमूल काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असे भाजपने म्हटले आहे. दरम्यान, तापन गोफानगर येथील मार्टिना किस्कू, शिउली मार्डी, ठकरान सोरेन, मालती मुर्मू यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com