भगवंत मान यांचं शहीद भगतसिंगांशी अनोख नातं; अशी आहे रंजक कहानी

cm bhagwant mann connection with bhagat singh
cm bhagwant mann connection with bhagat singh

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी आप नेते भगवंत मान विराजमान झाले. आपला बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी शहीद भगत सिंग यांच्या गावात शपथ घेतली. भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलानमध्ये मोठ्या थाटामाटात आणि शहीद भगतसिंग यांना स्मरण करत शपथविधी सोहळा पार पडला. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास 2 लाख लोकांनी हजेरी लावली होती. शहीद भगतसिंग स्मारकाच्या बाजुलाच 1 लाख लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आम्ही सगळे स्वातंत्र्यसैनिक असलेल्या भगतसिंग यांचा वारसा एकत्रित पुढे नेऊ, फक्त एकटाच शपथ घेणार नाही तर तुम्ही सर्वजण शपथ घ्या, हे तुमचंच सरकार असेल. राज्यातील 3 कोटी जनता माझ्यासोबत शपथ घेईल, अस त्यांनी म्हटलं होतं. अगदी त्याप्रमाणेच पंजाबच्या नव नियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शहीद भगतसिंग हे नाव फक्त आम आदमी पार्टीशी जोडले गेलेले नाही तर भगवंत मान यांच्या श्वासात भगतसिंग सामावलेले आहेत.

cm bhagwant mann connection with bhagat singh
अनेक वर्षांनंतर पंजाबला मिळणार प्रामाणिक मुख्यमंत्री : केजरीवाल

भगवंत मान यांनी जेव्हा त्यांची पहिली कार खरेदी केली तेव्हा ते सगळ्यात आधी भगतसिंग यांच्या खटकर कलान या गावी गेले. तिथे नमन केल्यानंतर त्यांनी प्रवास सुरु केला. भगतसिंग यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द वाचला आहे. त्यामुळेच राजकारणात आल्याचंही मान यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. भगतसिंह यांचा पुतण्या अभय सिंह संधू यांनी जेव्हा माजी मंत्री मनप्रीत सिंह बादल यांच्यासोबत मिळून पीपल्स पार्टी ऑफ पंजाबची स्थापना केली तेव्हा मान त्या पक्षात होते. मात्र हा पक्ष फार काळ राजकारणात टिकू शकला नाही. मान यांनी असं म्हटलं की, १९२९ मध्ये भगतसिंग यांनी संसदेत बॉम्ब फोडले होते, तशाच आवेशात मान यांनी घोषणा केली होती की ते संसदेत शब्दांचे बॉम्ब फोडणार.

cm bhagwant mann connection with bhagat singh
काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; सुनील जाखड यांचे मोठे विधान

आपची सत्ता आल्यानंतर भगत सिंग यांचा फोटो प्रत्येक कार्यालयात लावण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शहीद भगतसिंग यांचा फोटो पंजाबच्या सरकारी कार्यालयात दिसेल. मान यांनी त्यांचा शपथविधी अविस्मरणीय बनवण्यासाठी सर्वांना आवाहन केलं आहे की, आजच्या सोहळ्याला भगव्या रंगाची पगडी आणि दुपट्टा परिधान करून यावं.

2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भगतसिंग यांच्या आठवणीला उजाळा देत आपने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या हाती सत्ता देऊन 'इंकलाब' सत्यात उतरावण्याचा संकल्प पक्षाने केला होता. पंजाबला पुढे घेऊन जाण्यासाठी भगतसिंग यांच्या विचारांना साथ द्यायला हवी, असे नारा आम आदमी पार्टीने केला होता.

केजरीवाल यांचा पक्ष अन्ना हजारे यांच्या देशव्यापी अंदालनापासूनच भगतसिंग यांच्या नावाचा जयघोष करताना पाहायला मिळाले आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये भगतसिंग आर्काइव्ह अँण्ड रिसर्स सेंटरही सुरु केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com