

Punjab Election 2026
Esakal
विधानसभा निवडणुकीआधी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. यात एका माजी मंत्र्याचाही समावेश आहे. हरमीत सिंह पठाण माजरा आणि चेतन सिंह जोडा माजरा अशी आमदारांची नावे आहेत. दोघेही आमदारकीचं तिकीट कापल्याने नाराज होते अशी माहिती समजते. शनिवारी आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी ४० उमेदवारांची यादी जाहीर केली होती.