

Punjab Election strategy
esakal
BJP Punjab strategy: पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ज्याप्रमाणे भाजपने व्यापक जनसंपर्कासाठी 'यात्रा' या राजकीय अस्त्राचा प्रभावी वापर केला होता, त्याच धर्तीवर आता पंजाबमधील २०२७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने मोठी रणनीती आखली आहे. फरक एवढाच आहे की बंगालमध्ये 'परिवर्तना'चा नारा होता, तर पंजाबमध्ये भाजपने 'नशामुक्ती' हा प्रमुख मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे.