शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ सोमवारी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पंजाब बंदची हाक दिली आहे. या काळात आपत्कालीन सेवा वगळता सर्व काही बंद राहणार आहे. शेतकरी नेत्यांनी रस्ते, रेल्वे, दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पंजाब बंदच्या पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वेने पंजाबकडे जाणाऱ्या 163 गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे.