अमृतसर : पंजाबमधील पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) मोठी कारवाई करत ६ पाकिस्तानी ड्रोन (Punjab BSF Shoots Pakistani Drones) पाडले आहेत. अमृतसर आणि तरनतारन जिल्ह्यांच्या सीमेवर करण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान जवानांनी एक किलोपेक्षा अधिक हेरॉइन, पिस्तुले आणि मॅगझिन्स जप्त केली आहेत.