Punjab Bus Accident
Esakal
पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात भाविकांनी भरलेली बस अचानक पलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसमध्ये अंदाजे ३५ ते ४० भाविक प्रवास करत होते, अशी माहिती आहे.