Old Pension Scheme : पंजाब सरकारचा मोठा निर्णय; जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Bhagwant Mann

Old Pension Scheme : पंजाब सरकारचा मोठा निर्णय; जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी

चंदीगढ : पंजाब मंत्रिमंडळाने जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यास मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या निर्णयाची अधिकृत अधिसूचना काढण्यात येणार आहे. (Punjab cabinet approves old pension scheme)

हेही वाचा: Gujarat Election: गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीसांचा करिष्मा दिसेल का?; बिहार, गोव्यात दिसली होती चुणूक

सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या असताना पंजाब सरकारने आज जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. याआधी राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंडनेही जुनी पेन्शन योजना बहाल केली आहे.

हेही वाचा का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

जुन्या पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. मासिक निवृत्तीवेतन सामान्यत: त्या व्यक्तीच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या निम्मे असते. जुनी पेन्शन योजना डिसेंबर २००३ मध्ये बंद करण्यात आली होती. तसेच नवीन पेन्शन योजना १ एप्रिल २००४ रोजी अंमलात आली होती.

टॅग्स :PunjabPensionaap