CM चरणजीत सिंह चन्नी यांच्या पुतण्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

वाळू उत्खनन प्रकरण; भूपिंदर सिंग हनीला न्यायालयीन कोठडी
Bhupinder Honey
Bhupinder HoneyEsakal

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला अवैध वाळू उत्खनन प्रकरणी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २०१८ मध्ये अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासा दरम्यान भूपिंदर सिंहचे नाव समोर आले होते. यानंतर ईडीने या वर्षी जानेवारी महिन्यात भूपिंदर सिंग आणि त्याच्या साथीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. छाप्या दरम्यान ईडीने १० कोटी रुपयांची रोकड, २१ लाख रुपयांचे दागिने आणि रोलेक्स घड्याळ जप्त केले होते. ही कारवाई राजकीय हेतूने केली असल्याचा दावा काँग्रेसने (Congress) केला आहे.

भूपिंदर सिंगला ईडीने शुक्रवारी जालंधर न्यायालयात हजर केले. याआधीच्या दोन सुनावणींमध्ये न्यायालयाने भूपिंदरसिंग हनीचा ताबा ईडीकडे दिला होता. ईडीने ३ ते ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री भूपिंदर सिंगला अटक केली होती. यानंतर तो ८ फेब्रुवारीपर्यंत आणि पुन्हा ११ फेब्रुवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत होता.

ईडीच्या म्हणण्यानुसार, भूपिंदर सिंग हनीची जप्त केलेली १० कोटी रुपयांची रोकड त्याच्या मालकीची असल्याची कबुली दिली होती. ईडीने होमलँड हाइट्ससह दहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. ईडीच्या अधिकार्‍यांनी हनीचा बिझनेस पार्टनर कुदरत दीप सिंगचा जबाबही नोंदवला होता.

Bhupinder Honey
'पंजाबात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी निवड'

चरणजीत सिंह चन्नी यांनी दिली प्रतिक्रिया

चरणजीत सिंह चन्नी यांनी याआधी यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, 'कायदा आपले काम करत आहे आणि आमचा त्याला आक्षेप नाही. आठ दिवसांच्या चौकशी दरम्यान ईडीने भूपिंदर सिंग यांना अनेक प्रश्न विचारले. याशिवाय वकील हरनीत सिंग ओबेरॉय यांनाही भूपिंदर सिंग यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com