मिसेस मुख्यमंत्र्यांना चक्क २३ लाखांचा चुना

वृत्तसंस्था
Thursday, 8 August 2019

बॅंकेचा व्यवस्थापक असल्याची बतावणी करून एका चोरट्याने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परिणित कौर यांची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. परिणित कौर यांच्या मोबाईलवर फोन करून एकाने त्यांना फसविले. त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

चंडीगड ः बॅंकेचा व्यवस्थापक असल्याची बतावणी करून एका चोरट्याने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परिणित कौर यांची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. परिणित कौर यांच्या मोबाईलवर फोन करून एकाने त्यांना फसविले. त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

झारखंडमधील रांचीतून हा फोन कॉल केला गेल्याचे तपासात स्पष्ट झाले. परिणित कौर या पतियाळाच्या खासदार असून, संसद अधिवेशनासाठी त्या दिल्लीत असताना एका राष्ट्रीयीकृत बॅंकेचा व्यवस्थापक असल्याचे भासविणाऱ्याने त्यांना फोन करून परिणित कौर यांच्या बॅंक खात्याचा तपशील मागितला.

दरम्यान, परिणित कौर यांचे वेतन खात्यात जमा करण्यासाठी हा तपशील मागण्यात आला होता. परिणित कौर यांच्या खात्याचा क्रमांक, एटीएमचा "पिन', "सीव्हीसी' क्रमांक आणि "ओटीपी' या चोरट्याने मिळविला. त्यानंतर खात्यातून 23 लाख रुपये काढले गेल्याचा एसएमएस आल्यावर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab CM's wife falls prey to cyber fraud, duped of Rs 23 lakh