चार दिवस भाजपात मुक्काम! काँग्रेस नेत्याची पुन्हा घरवापसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab

२८ डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याने पुन्हा काँग्रेसची वाट धरली.

चार दिवस भाजपात मुक्काम! काँग्रेस नेत्याची पुन्हा घरवापसी

पंजाब काँग्रेसमध्ये (Congress) असलेल्या अंतर्गंत वादामुळे अनेक नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केला. यातच काँग्रेस आमदार बलविंदर सिंह लाडी (Balwinder Singh Laddi) यांनी गेल्या आठवड्यात भाजपची वाट धरली होती. अवघ्या चार दिवसात त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रवेश केल्यानं आता नवी चर्चा सुरु झाली आहे. बलविंदर सिंग हे पंजाबच्या हरगोविंदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी २८ डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बलविंदर सिंग यांच्यासह राणा गुरमित सोधी, फतेह जंग बाजवा यांनीही भाजप प्रवेश केला होता. आता यातील बलविंदर सिंग यांनी अवघ्या चारच दिवसात भाजपला रामराम केला आहे. काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशावरून प्रश्न उपस्थित होत होते. जर काँग्रेस नकोय तर कॅप्टन अमरिंदर यांच्या पंजाब लोक काँग्रेसमध्ये का जात नाही असं विचारलं जात होतं.

हेही वाचा: राष्ट्रीय राजकारणात 'आप'ची दमदार एन्ट्री; पंजाबात केजरीवालांची सत्ता?

लाडी यांनी सोमवारी याची घोषणा करताना रविवारी रात्री काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश चौधरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केल्याची माहिती दिली. याचाच अर्थ २८ तारखेला भाजपमध्ये जाण्याची घोषणा केल्यानंतर ते चारच दिवस भाजपमध्ये राहिले असं म्हणता येईल. आता अशीही चर्चा पंजाबमध्ये आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग हे त्यांचा पक्ष भविष्यात भाजपमध्ये विलिन करतील. त्यांच्या जवळचे नेते भाजपमध्ये गेल्यानं असं म्हटलं जात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpCongressPunjab
loading image
go to top