राष्ट्रीय राजकारणात 'आप'ची दमदार एन्ट्री; पंजाबात केजरीवालांची सत्ता?

Arvind Kejriwal
Arvind Kejriwalesakal
Summary

'हा' आकडा खरा ठरला, तर राष्ट्रीय राजकारणात आपची दमदार एन्ट्री होऊ शकते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) आता दिल्लीबाहेर अनेक राज्यांत जोरदार मुसंडी मारू शकतो. टाइम्स नाऊ नवभारतच्या (5 राज्यांची निवडणूक) ओपिनियन पोलमध्ये हा दावा करण्यात आलाय. सर्वेक्षणानुसार, पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्ष बहुमताच्या तुलनेत किरकोळ मागं असेल. याशिवाय, गोवा आणि उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) हा पक्ष जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. हा आकडा खरा ठरला तर राष्ट्रीय राजकारणात आम आदमी पक्षाचं हे मजबूत स्थान असणार आहे. पोलनुसार, पंजाबमधील 117 जागांपैकी आम आदमी पक्ष 53 ते 57 जागा जिंकू शकतो, असं नमूद करण्यात आलंय.

Arvind Kejriwal
राजकीय धुरळ्यानं समीकरण बदलणार? थेट भाजप आमदारचं अजितदादांच्या 'प्रेमात'

निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला (Congress) केवळ 41 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. अकाली आघाडीला 14 ते 17 जागा मिळू शकतात. तर, भाजप-कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्या युतीला केवळ 1 ते 3 जागांवर समाधान मानावं लागेल. उत्तराखंडबद्दल बोलायचं झालं तर, या निवडणुकीत भाजपचा (BJP) झेंडा फडकणार आहे. राज्यातील 70 पैकी 42 ते 48 जागा जिंकून भाजपला सहज बहुमत मिळू शकतं, तर काँग्रेसला केवळ 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र, आम आदमी पक्ष इथंही 4 ते 7 जागा जिंकून आश्चर्यचकित करू शकतो.

Arvind Kejriwal
राज्यमंत्र्यांची थेट BJP आमदाराला राष्ट्रवादीत येण्याची 'ऑफर'

त्याचप्रमाणं गोव्यातही (Goa) आम आदमी पक्ष प्रमुख विरोधी पक्ष बनण्याच्या स्थितीत येऊ शकतो. 40 जागांच्या राज्यात भाजप 18 ते 22 जागा जिंकू शकतो. तर दुसरीकडं आम आदमी पक्षाला 7 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या काँग्रेसला केवळ 4 ते 6 जागा मिळू शकतात. त्याचवेळी काँग्रेससह अनेक पक्षांचे नेते फोडणारी तृणमूल काँग्रेसही (Trinamool Congress) तशी कामगिरी करताना दिसत नाहीय. सर्वेक्षणानुसार, राज्यात तृणमूलचं खातं उघडणंही अवघड आहे. मात्र, राज्यात ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) पक्षाला 2 टक्के मतं मिळू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com