PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal

मला पंजाबची सेवा करण्याची संधी मिळाली नाही; मोदींनी व्यक्त केली खंत

Summary

मोदी म्हणाले की, मला आज बोलायचं आहे, थोडं कटू आहे पण आज बोलणारच.

पठाणकोट - पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज पठाणकोटमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी मला पंजाबची (Punjab) सेवा करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मोदी म्हणाले की, मला आज बोलायचं आहे, थोडं कटू आहे पण आज बोलणारच, मला पंजाबची सेवा करायची संधी मिळाली नाही. आम्हाला पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या असं भावनिक आवाहन मोदींनी केलं.

'आधी आमची परिस्थिती इथे खूप बिकट होती. सुरुवातीला पक्षाचं नुकसान झालं पण पंजाबच्या शांततेसाठी, उज्वल भविष्यासाठी पक्षाने ते सहन केलं. आम्ही इथं एक लहान पक्ष म्हणून सरकारच्या इशाऱ्यावर चालायचो असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

'ज्या ज्या राज्यात आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तिथे विकास वेगाने सुरु आहे. जिथे एकदा भाजप येतं तिथं दिल्लीत बसून रिमोट कंट्रोलनं सरकार चालवणाऱ्या कुटुंबाचे धाबे दणाणतात. जिथं शांती सुरक्षा येते तिथून भ्रष्टाचार, द्वेष घालवला जातो. हेच पंजाबमध्ये प्रस्थापित करायचं आहे. पंजाबच्या विकासासाठी, नव्या पंजाबसाठी कष्ट करण्यात कसलीच कसूर सोडणार नाही.'असंही मोदी म्हणाले.

PM Narendra Modi
अजित डोभालांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न; एक जण ताब्यात

मोदी म्हणाले की,'आपल्या लष्करावर शंका घेतली, यांनी शहीदांच्या हौतात्म्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीवेळीही दरवेळी यांच्याकडून टीका केली जातात. पुरावे मागितले जातात. मी वीर जवान आणि माजी सैनिकांचे आभार मानतो की काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही ठरवा की सीमेवर असलेल्या पंजाबसारख्या राज्याची सुरक्षा कुणाच्या हातात द्यायची.'

काँग्रेसनं पंजाब आणि देशाविरोधात काय काय नाही केला. पठाणकोटवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा देश त्या संवेदनशील क्षणी एकत्र होता. मात्र काँग्रेस पक्षाचे नेत काय करत होते? त्यांनी लष्कराच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले की नाही केले? असे प्रश्नही मोदींनी उपस्थित केले. मोदी म्हणाले की,'वीर जवानांच्या हौतात्म्यावर यांनी चिखलफेक केली. काँग्रेसचे लोकांना त्यांची पापं थांबवता आली नाहीत. ते आमच्या लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे पुरावे मागायला लागलेत.',असंही मोदींनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com