'मला रिमोटने कंट्रोल केलं जातंय', डोभालांच्या घरात घुसणाऱ्याचा खुलासा

NSA Ajit Doval security breached man detained
NSA Ajit Doval security breached man detained esakal

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) यांच्या घरात एक व्यक्ती जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे अजित डोभाल यांच्या निवसस्थानाजवळ एकच गोंधळ निर्माण झाला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. ही घटना आज ( दि. 16 ) रोजी घडली. (Ajit Doval security breached)

NSA Ajit Doval security breached man detained
'राशी बेवफा है' 20 रुपयांची नोट होतेय व्हायरल!

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अजित डोभाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती तपासादरम्यान असंबंध वक्तव्ये करत आहे. तो म्हणत होता की त्याला अजित डोभाल (Ajit Doval) यांना भेटायचे आहे. त्याची अडचण तेच सोडवू शकतात. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की हा व्यक्ती मानसिक रोगी वाटत आहे. तो एक भाड्याची गाडी चावलत होता.

NSA Ajit Doval security breached man detained
मोदी रमले भजनात, शेअर केला रविदास मंदिरातील व्हिडिओ

अजित डोभाल हे दिल्लीतील एका अत्यंत सुरक्षित भागात राहतात. ते ल्युटियन्स झोनमधील 5 जनपथ बंगल्यात राहतात. त्यांच्या आधी या बंगल्यात माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल रहात होते. त्यांच्या बंगल्याशेजारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा बंगला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com