बारामतीकरांनी हात दिला, तर काहीही होऊ शकतं; राज्यमंत्र्यांची थेट BJP आमदाराला राष्ट्रवादीत येण्याची 'ऑफर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar-Sharad Pawar

'तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा.'

राज्यमंत्र्यांची थेट BJP आमदाराला राष्ट्रवादीत येण्याची 'ऑफर'

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपली कामाची शैली, धडपड आणि रोखठोक मत यामुळं चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी जाहीर कार्यक्रमात अजितदादांचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी आमदार गोरेंना थेट ऑफरच देऊन टाकलीय. त्यामुळं राजकीय समीकरणं बदलणार का? अशी चर्चा रंगलीय.

बारामतीत डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उद्‌घाटन अजित पवारांनी केलं. मात्र, वेळेपूर्वी तासभर येत उद्‌घाटन उरकून अजित पवार निघून गेले होते. जयकुमार गोरे व दत्तात्रय भरणे चार वाजता कार्यक्रमस्थळी पोचले आणि आयोजकांनी त्यांनाही व्यासपीठावर येत बोलण्याचा आग्रह केला. जयकुमार गोरेंनी अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.

हेही वाचा: राजकीय धुरळ्यानं समीकरण बदलणार? थेट भाजप आमदारचं अजितदादांच्या 'प्रेमात'

हाच धागा पकडत दत्तात्रय भरणे यांनी त्यांना लगेचच राष्ट्रवादीच्या प्रवेशाचीच त्यांना ऑफर देऊन टाकली. थेट ऑफर दिलेली नसली तरी ‘तुमचा विचार असेल तर आम्हीही त्याला प्रतिसाद देऊ,’ असे ते म्हणाले. बारामतीकरांनी हात दिला तर काहीही होऊ शकतो आणि गोरे यांच्याकडे पाहत भरणे म्हणाले, चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा. त्याला चांगला विचार, असे भरणे यांनी शब्द वापरला. बारामतीत झालेल्या या राजकीय धुरळ्याने आता पुन्हा काही राजकीय समीकरणे बदलतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: ओबीसींचा Empirical Data मार्चपर्यंत मिळणार : अजित पवार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top