Punjab Election : शिरोमणी अकाली दल-भाजप युती होणार? मजेठियांनी केलं स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bikram Singh_Amit Shah

Punjab Election : शिरोमणी अकाली दल-भाजप युती होणार? मजेठियांनी केलं स्पष्ट

नवी दिल्ली : पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं मतदान (Punjab Poll) सुरु आहे. या मतदानाचा कल लक्षात घेता राजकीय समिकरणं बदलू शकतात. पंजाबमधील स्थानिक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल (Shiromani Akali Dal) आणि भाजप (BJP) हे जुने सहकारी आहेत. शेतकरी आंदोलनावरुन यांच्या युतीत फूट पडली. पंजाब विधानसभेसाठी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत असले तरी ते पुन्हा एकत्र येण्याची चिन्हं आहेत. शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. (Punjab Election will Shiromani Akali Dal BJP alliance said Brikam Majithia)

ब्रिकम सिंग म्हणाले, पंजाबच्या जनतेच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरु आहे. अमृतसर पूर्वमध्ये विकास गरजेचा आहे. या ठिकाणच्या गरीब जनतेपर्यंत कल्याणकारी योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत. हा भाग सर्वाधिक मागास आहे. पण सत्याचाच विजय होईल. पंजाबच्या निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करायची की नाही हे निश्चित होईल.

हेही वाचा: केंद्राच्या आदेशावरून नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई

मजिठिया यांनी दोन जागांवरुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमृतसर ईस्टमधून ते काँग्रेसचे उमेदवार नवज्योतसिंग सिद्धू यांना टक्कर देणार आहेत. त्याचबरोबर मजेठिया मतदारसंघातूनही त्यांनी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी..., सोमय्यांचा सरकारला इशारा

काँग्रेसवरही मजेठिया यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, घमेंडी राजकारणाचा शेवट होणार आहे. लोकांनी काँग्रेसला पाच वर्षे सत्ता देऊन पाहिलं पण त्यांनी काहीही केलं नाही. अकाली दलाचे नेते गुरबचन सिंग यांनी संकेत दिले की, पक्षाच्या जागा कमी झाल्या तर भाजपसोबत युतीबाबत विचार केला जाईल. गुरबचन सिंग हे गुरुदासपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Web Title: Punjab Election Will Shiromani Akali Dal Bjp Alliance Said Brikam Majithia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PunjabDesh news
go to top