केंद्राच्या आदेशावरून नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई

राणेंच्या आदीश बंगल्याच्या पाहाणी नाट्यानंतर नीलरत्न बंगल्यालावरही कारवाईचे आदेश दिले
नारायण राणे
नारायण राणेgoogle
Summary

राणेंच्या आदीश बंगल्याच्या पाहाणी नाट्यानंतर नीलरत्न बंगल्यालावरही कारवाईचे आदेश दिले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता यावरून भाजपा आणि शिवेसेना वाद आणखी चिघळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भारत सरकारच्या (Central Govt.) मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे दिले आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) आदीश बंगल्याच्या पाहाणी नाट्यानंतर आता नीलरत्न बंगल्यालावरही कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. दरम्यान, काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) आणि मातोश्रीवर टीका केली होती. या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे.

एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्या मालवण येथील निल रत्न बंगला बांधताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले अशी तक्रार ऑगस्ट 2021 ला केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नारायण राणे
उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी..., सोमय्यांचा सरकारला इशारा

दरम्यान, आता या कारवाईमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद वाढणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. (Konkan news) मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील ( नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे वारंवार भाजपा नेते सांगत आहेत. यावरून शिवसेनेनही (Shivsena) आपलं शाब्दिक हत्यार बाहेर काढत प्रतित्युर देण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील आदीश बंगल्यासंदर्भात झालेल्या चौकशी नंतर आता नीलरत्नचीही चौकशी करण्याचे आदेश आले आहेत. आता पुन्हा एकदा नारायण राणे यांचे पुढचे पाऊल काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com