पंजाबमधील जुळ्या सोहना-मोहनाला मिळाले स्वतंत्र मतदार कार्ड

पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान तर, 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.
Sohana-Mohana
Sohana-Mohana

अमृतसर : पंजाबमधील (Punjab Conjoined Twins ) प्रसिद्ध असलेल्या सोहना-मोहना (Sohana & Mohana Singh) या दोन भावंडांना मंगळवारी दोन स्वतंत्र मतदार (Voters ID Card) ओळखपत्रे देण्यात आली. गेल्या वर्षी हे दोघेही 180 वर्षांचे झाले होते. पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) डॉ. एस करुणा राजू (Dr. S Kruna Raju) यांनी 12 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त या दोघांना दोन स्वतंत्र निवडणूक ओळखपत्र सुपूर्द केले. पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. (Punjab's famous conjoined twins, Sohan Singh and Mohan Singh, get two separate voter ID cards)

Sohana-Mohana
Survey : देशात मतदानाबाबत मत बदललं; 86 टक्के लोक म्हणतात...

दरम्यान, सोहना आणि मोहना यांच्यासाठी मतदानावेळी (Punjab Assembly Election 2022) विशेष व्यवस्था केली जाईल जेणेकरून दोघांनाही स्वतंत्रपणे मतदान (Voting) करता येईल आणि त्यांची गोपनीयता राखली जाईल, असे डॉ. राजू यांनी यावेळी सांगितले. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोहना आणि मोहना यांना स्वतंत्र मतदार मानले होते आणि दोघांना वैयक्तिक मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. (Election Commission Of India) त्यानंतर आज अखेर या दोघांनाही वेगवेगळी मतदार (Election Card) ओळखपत्रे देण्यात आली आहेत.

या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची (National Voters Day Them) थीम 'निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी बनवणे' अशी ठेवण्यात आली होती. जून 2003 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या या जुळ्या मुलांना त्यांच्या पालकांनी सोडून दिले होते. त्यानंतर अमृतसरमधील एका अनाथाश्रमाने त्यांना दत्तक घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com