
Summary :
पंजाबमध्ये ३७ वर्षांनंतर भीषण पूर, १,००० पेक्षा जास्त गावे आणि ६१,००० हेक्टर शेती बाधित.
पूरस्थितीवर "बीबीएमबीने वेळेवर पाणी न सोडल्याने हानी वाढली" असा राज्य सरकारचा आरोप, विरोधकांनी "अक्षम व्यवस्थापन" जबाबदार धरले.
केंद्राकडे विशेष मदतीची मागणी; अकाल तख्त जत्थेदारांनी लोकांना एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले.
पंजाबमध्ये ३७ वर्षांनंतर आलेल्या भीषण पुरामुळे १,००० हून अधिक गावे आणि ६१,००० हेक्टरहून अधिक शेती जमीन बाधित झाली आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुुर सुरू आहे. सर्वात जास्त पूरग्रस्त गावे गुरुदासपूर जिल्ह्यात आहेत. दरम्यान आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारच्या 'अक्षमते'मुळे पंजाबमधील लोक त्रस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असताना, राज्याचे जलसंपदा मंत्री बी. कुमार गोयल यांनी असा दावा केला की जर केंद्राच्या अखत्यारीतील भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाने (बीबीएमबी) जूनमध्ये वेळेवर पाणी सोडले असते तर हा विध्वंस मोठ्या प्रमाणात कमी करता आला असता.