
Summary
पंजाबमधील १२ जिल्ह्यातील १ हजार गावे पुरग्रस्त, आतापर्यंत ३ लाख लोकांचे स्थलांतर.
३० जणांचा मृत्यू, १५ लाख लोकांवर संकट; लाखो एकर शेतीचे प्रचंड नुकसान.
सतलज, बियास, रावी व घग्गर नद्या धोक्याची पातळी ओलांडली; हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला.
Punjab Villages Submerged : संपूर्ण उत्तर भारतात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः गेल्या काही दिवसापासून पंजाबमधील परिस्थिती चिंताजनक आहे. पंजाबमधील सतलज, बियास, रावी आणि घग्गर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आतापर्यंत १२ जिल्ह्यांतील १ हजारांहून अधिक गावे बाधित झाली असून ३ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.