Punjab Flood : पंतप्रधान मोदी करणार पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा; २००० गावे बुडाली, ४६ जणांचा मृत्यू, लाखो हेक्टर शेतीचे नुकसान

Punjab Flood : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी पंजाबच्या पूरग्रस्त जिल्ह्या गुरुदासपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच, पंतप्रधान पूरग्रस्त लोकांशी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील.
Flood-hit Punjab villages submerged under water as rescue teams carry out relief operations amid Prime Minister Narendra Modi’s scheduled visit.

Flood-hit Punjab villages submerged under water as rescue teams carry out relief operations amid Prime Minister Narendra Modi’s scheduled visit.

esakal

Updated on
Summary

पंजाबमध्ये आलेल्या पूरामुळे ४६ जणांचा मृत्यू झाला असून, लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. २,००० गावे पाण्याखाली गेली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त भागांचा दौरा करणार असून, पूरग्रस्त लोकांशी थेट संवाद साधणार आहेत.

मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पंजाबमध्ये पन्नास वर्षातील सर्वातील सर्वात भयानक पूर आला आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीत मृतांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे, तर १.७५ लाख हेक्टरवरील उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत आणि २३ जिल्ह्यांमधील १,९९६ गावे पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देणार असल्याची माहिती येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com