Punjab Flood : पंजाबच्या १९ जिल्ह्यांना फटका; आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू , १५०० नागरिक छावण्यांत

राज्यातील १७३ मदत छावण्यांत १,६१६ नागरिक राहत आहे
Punjab Rain News
Punjab Rain Newssakal

चंडीगड : पंजाबमध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला असून आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील १७३ मदत छावण्यांत १,६१६ नागरिक राहत आहेत. पुराचा राज्यातील १९ जिल्ह्यांना फटका बसला आहे.

या जिल्ह्यांत तरण तारण, फिरोझपूर, फतेहगड साहिब, पतियाळा आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकार व बचाव पथकांनी पूरग्रस्त भागांतून २७, २८६ जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.

महसूल खात्याच्या अहवालानुसार, पुरामुळे ४१ जणांचा मृत्यू झाला. पंजाब व हरियानातील अनेक जिल्ह्यांना नुकताच मुसळधार पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे, दैनंदिन जीवन विस्कळित झाले तर पुराचे पाणी रहिवासी तसेच शेतांमध्येही घुसले.

Punjab Rain News
Punjab 95 TIIFF : कोण आहे 'जसवंत सिंग खालरा'? 'पंजाब 95' एवढी का होतेय चर्चा?

पंजाबचे ऊर्जामंत्री हरभजनसिंग म्हणाले, की पूरग्रस्त भागातील ५९५ ठिकाणचा खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. राज्यातील रुपीनगर, पातियाला आणि संगरुर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून पुरामुळे पंजाब राज्य ऊर्जा महामंडळाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजेचे खांब उन्मळून पडले, ट्रान्सफॉर्मरचे तसेच विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. राज्यातील ६६ केव्ही सबस्टेशन जलमय झाले.

यमुनेची पाणीपातळी वाढण्याची शक्यता

येथील यमुना नदी बुधवारी इशारा पातळीच्या खाली वाहत होती. परंतु, परिसरातील पावसामध्ये झालेली वाढ पाहता, नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येथील जुन्या रेल्वे पुलावरील पाणीपातळी सकाळी नऊ वाजता २०५.०९ इतकी होती.

Punjab Rain News
Maharashtra Rain Update: उद्या 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट! मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कसा असेल पाऊस?

ओडिशात मुसळधार

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण ओडिशात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मलकानगिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली असून एकजण वाहून गेला.

गेल्याच आठवड्यात या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला होता. मलकानगिरीत ८० मिमी तर गंजम जिल्ह्यात ५३ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान खात्याने गंजम, गजपती, पुरी आदी जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे.

दिल्लीत वाहतूक कोंडी

दिल्लीकरांची बुधवारची पहाट जोरदार पावसाने उजाडली. राजधानीतील आयटीओसारख्या भागात पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडला. येथील सफदरजंग वेळशाळेमध्ये सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ३७.१ मिमी इतका पाऊस नोंदला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com