कुमार विश्वास यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती I Kumar Vishwas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kumar Vishwas

'माझ्यावर राजकीय सूडबुध्दीनं हा गुन्हा दाखल केला गेलाय.'

कुमार विश्वास यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळं कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाकडून (Punjab-Haryana High Court) दिलासा मिळालाय. न्यायालयानं विश्वास यांच्या अटकेला स्थगिती दिलीय. पंजाबमधील रोपर इथं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केजरीवाल यांचे खलिस्तानशी संबंध असल्याचा खोटा आरोप विश्वास यांनी केला होता.

याबाबत कुमार विश्वास यांनी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलंय, माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायद्याच्या चौकटीत बसत नाहीय. माझ्यावर राजकीय सूडबुध्दीनं हा गुन्हा दाखल केला गेलाय, असं त्यांनी नमूद केलं होतं.

हेही वाचा: 'बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय'

पंजाबमधील रूपनगर येथील सदर पोलिस ठाण्यात (Punjab Police Station) 12 एप्रिल रोजी विश्वास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Assembly Election) केजरीवाल फुटीरतावाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप विश्वास यांनी केला होता. पंजाब पोलिसांनी 20 एप्रिल रोजी विश्वास यांच्या गाझियाबादमधील घरी पोहोचून त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

Web Title: Punjab High Court Stayed Kumar Vishwas Arrest Statement Against Arvind Kejriwal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top