
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रस्त्याच्या दुभाजकावरच एका महिलेचा मृतदेह फेकला. एका पोत्यात भरून त्यांनी मृतदेह आणला होता. जेव्हा त्यांना इतरांनी पोत्यात काय आहे हे विचारलं तेव्हा त्यांनी सडलेले आंबे असल्याचं सांगितलं. महिलेचा मृतदेह फेकून दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. स्थानिकांनी पोलिसांना बोलावून पोत्यात काय आहे ते चेक केलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पंजाबच्या लुधियानात फिरोजपूर रोडवर ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.