Punjabi Wedding Viral Video
esakal
Punjabi Wedding Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका पंजाबी लग्नाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवविवाहित जोडप्यावर अक्षरशः नोटांचा वर्षाव होताना (Punjabi Wedding Viral Video) दिसतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उधळण्यात आली, की संपूर्ण डान्स फ्लोअर नोटांनी झाकून गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नात सुमारे ८.५ कोटी रुपयांची रोकड उधळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.