दिवाळीत MADE IN INDIA वस्तू खरेदीवर भर द्या - नरेंद्र मोदी

'सर्वच क्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडत आहेत'
PM Modi
PM ModiANI

नवी दिल्ली: भारताने काल १०० कोटी लसीकरणाचा (vaccination) टप्पा ओलांडला तसेच दिवाळीचा सण (Diwali festival) जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) आज देशवासियांशी संवाद साधला. "आज लसीकरणाचा वेग वाढला असून क्रीडा, मनोरंजन सर्वच क्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडत आहेत. मेड इन इंडियाची (Made in India) ताकद मोठी आहे. छोट्यात छोटी मेड इन इंडिया वस्तू खरेदी करण्यावर जोर द्या. सगळ्यांच्या प्रयत्नाने हे शक्य होईल. ज्या प्रमाणे स्वच्छ भारत जनआंदोलन झाले तसेच भारतात बनवलेल्या वस्तू व्होकल फॉर लोकल हे तत्व आचारणात आणले पाहिजे" असे मोदी म्हणाले.

सगळ्यांच्या प्रयत्नाने हे शक्य करुन दाखवू, असे मोदी म्हणाले. "लस सुरक्षा देऊ शकते. देशात बनवलेल्या उत्पादनामुळे दिवाळी अधिक भव्य होईल" असे मोदी म्हणाले. "दिवाळी दरम्यान होणारी वस्तुंची विक्री आणि इतरवेळची विक्री यामध्ये फरक आहे" असे मोदी म्हणाले. लसीकरणात देशाने ओलांडलेला १०० कोटीचा टप्पा हे छोटे छोटे दुकानदार, व्यापारी यांच्यासाठी आशेचा किरण आहे, असे मोदी यांनी सांगितले.

PM Modi
'जपून ठेवलेली बक्षिसाची ती नोट अखेर गरिबीमुळे करावी लागली खर्च'

"देश-विदेशातील अनेक एजन्सी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक आहेत. भारतीय कंपन्यांमध्ये रेकॉर्ड गुंतवणूक होत आहे. युवकांसाठी रोजागाराची संधी वाढत आहे. स्टार्ट अपमध्ये रेकॉर्ड गुंतवणूक होत आहे. हाऊसिंग सेक्टरमध्ये नवीन ऊर्जा दिसत आहे" असे मोदी यांनी सांगितले.

PM Modi
सोलापूर : पत्रकार असल्याचे सांगून तलवारीने केला हल्ला

"मागच्या काही महिन्यात अनेक सुधारणा केल्या. गती-शक्ती ते ड्रोन पॉलिसी भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे घेऊन जाण्यात आज मोठी भूमिका बजावत आहेत. आज रेकॉर्ड लेव्हल धान्याची खरेदी होत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात आहेत" असे मोदींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com