सोलापूर : पत्रकार असल्याचे सांगून तलवारीने केला हल्ला

हल्ला करत ट्रकमध्ये चढून एकजणाचे १२ हजार रुपये पळविल्याबद्दल सलगरवस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तलवारीने हल्ला! गुन्हा दाखल
तलवारीने हल्ला! गुन्हा दाखलGallery
Updated on

सोलापूर : पत्रकार असल्याचे सांगून तलवारीने हल्ला करत ट्रकमध्ये चढून एकजणाचे १२ हजार रुपये पळविल्याबद्दल सलगरवस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शिवशंकर मोरतळे हे बुधवारी (ता.२०) त्यांच्या ट्रकमध्ये युटोपियन साखर कारखान्यातून नागपूरला साखर घेऊन जात होते. त्यांचा ट्रक वाले पेट्रोल पंपावर आलेला असताना संशयीत गंगाधर जेरबंडी (रा. विजापूर रोड) व गणेश गोपाळ पवार (रा. माशाळे वस्ती, सोलापूर) हे दोघेजण तेथे आले.

आम्ही जी-नाईनचे पत्रकार आहोत. तुमच्या ट्रकमध्ये गुटखा आहे, असे सांगून केबिनमध्ये चढले. शर्टमध्ये लपवलेली तलवार काढून वार केला. तसेच श्री मोरतळे यांच्या खिशातून १२ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर आरडाओरड झाल्याने दोघेही पळू लागले. त्यापैकी पंपावरील लोकांनी एकास पकडल्यानंतर तो अंधाराचा फायदा घेऊन निसटून गेला. तेवढ्यात सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहोचल्यानंतर अंधारात लपलेल्या गंगाधर जेरबंडी यास पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी शिवशंकर मोरतळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी श्री. माळी हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com