Purulia Road Accident : आज (शुक्रवार) सकाळी पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १८ वर एक हृदयद्रावक रस्ता अपघात घडला. या अपघातात बोलेरो वाहनातील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बलरामपूर पोलीस ठाण्याच्या (Balrampur Police Station) हद्दीत असलेल्या नामसोल प्राथमिक शाळेजवळ घडलीये.