
जॉइंट बेस एलमेंडॉर्फ-रिचर्डसन (अलास्का) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्या भेटीच्या निमित्ताने अमेरिकेने पुतीन यांच्यासमोर आपल्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवले. पुतीन अलास्का येथे दाखल झाल्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाने पुतीन यांचे खास शैलीत स्वागत केले. यावेळी ‘बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर’ आणि ‘फायटर जेट्स’ यांचे उड्डाण झाले. यावेळी पुतीन यांनी आकाशाकडे पाहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, ट्रम्प-पुतीन चर्चेमध्ये पुतीन यांच्याकडून अलास्काच्या ऐतिहासिक वारशाचे स्मरण झाले आणि महायुद्धातील संदर्भही पुतीन यांनी दिले.