या फोटोमध्ये तुम्हाला एक भला मोठा अजगर सापडला का  ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

नेटिझन्स सध्यातरी या फोटोतील अजगराला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. 
तुम्ही सुद्धा हे चॅलेंज घ्या आणि तो अजगर शोधून दाखवा. 

देशभरात करोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन वाढवून अनलॉक २ करण्यात आला आहे. बहुतेकजण घरातच आहेत. घरातल्या घरात कुटुंबासह काही गेम खेळले जात आहेत किंवा मित्रमैत्रिणींसह तुम्ही ऑनलाइन गेम खेळत असाल. तर असाच एक भन्नाट गेम तुमच्यासाठी आहे. सध्या सोशल मीडियावर बरेच जण असे अजब गजब गेम खेळत आहे. आता हाच  फोटो पहा ना त्यामध्ये भलामोठा अजगर लपून बसला असून  तुम्हाला फक्त त्याला शोधायचं आहे.

एका फेसबुक युझरने हा एक फोटो शेअर केला असून त्याने त्या फोटो मध्ये साप शोधण्याचं आव्हान दिलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल झाला आहे, त्यानंतर नेटिझन्स आता हा साप शोधण्यात व्यस्त झालेले आहेत. 

बातमी वाचताच तुम्ही म्हणाल कि, या फोटोत फक्त अजगरालाच शोधायचं आहे ना ? हे तर किती सोपं काम आहे. मात्र कित्येक युझर्सना हा अजगर काही सापडलेला नाही. कारण या फोटोत अजगर शोधणं म्हणजे आकाशात आपल्या आवडीचा तारा शोधण्यासारखे अवघड काम आहे.

तुम्हाला जर का या फोटोत अजगर शोधणं सोपं वाटत असेल तर मग तुम्ही हा फोटो पाहा आणि बघा तुम्हाला सापडतो आहे का ? सापडला का अजगर ?  त्या तिथे लाकडाच्या ढिगाऱ्याखाली नीट लक्षपूर्वक पाहा. हो ! तो पहा त्या लाकडांच्या खालीच अजगर लपलेला आहे. त्याने आपलं तोंड हलकसं वर काढलेलं आहे.

तुम्हाला तो लपलेला अजगर सापडला तर मग उत्तमच आहे. आता अजगर शोधण्याचं हे चॅलेंज तुमच्या मित्रमैत्रिणींना देण्यासाठी,  त्यांना ही बातमी शेअर करा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: python hiding in photo find python viral photo game