मोदींची पाकिस्तानी बहिण यंदाही बांधणार राखी?

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

कमर मोहसीन शेख यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला असला तरी त्यांचा विवाह भारतीयाशी झाला. त्या भारतात राहत असून, गेल्या 37 वर्षांपासून त्या मोदींना राखी बांधत आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या 37 वर्षांपासून राखी बांधत असलेली त्यांची मुस्लिम बहिण यंदाही त्यांना राखी बांधणार हे जवळपास निश्चित आहे. 

कमर मोहसीन शेख यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला असला तरी त्यांचा विवाह भारतीयाशी झाला. त्या भारतात राहत असून, गेल्या 37 वर्षांपासून त्या मोदींना राखी बांधत आहेत. अद्याप त्यांच्या मनात पाकिस्तानच्या आठवणी ताज्या आहेत. दोन्ही देशांमध्ये सलोखा असावा, अशी त्यांची इच्छा आहे.

गुजरातचे माजी राज्यपाल स्वरूप सिंह मला मुलीसारखे मानायचे. जेव्हा ते गुजरातमधून जायला लागले तेव्हा नरेंद्र मोदी त्यांना सोडायला विमानतळावर आले. तेव्हा स्वरूप सिंह म्हणाले की कमर माझी मुलगी आहे आणि तिच्यावर लक्ष ठेवा. यावर मोदींनी सांगितल तुमची मुलगी म्हणजे ती आमची बहीण झाली, अशी आठवण कमर सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Qamar Mohsin Sheikh ties Rakhi to PM Narendra Modi