रामायण-महाभारताचा शो, गायत्री मंत्राचा जप; कोविड सेंटर 'भक्तिमय'

quarantine centre bhopal
quarantine centre bhopalindia today

भोपाळ (Bhopal)- देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेले काही दिवस देशात चार लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले होते. सोमवारी यात थोडी घट झाली असली तर चिंता कायम आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटल सुविधा कमी पडत आहेत. अशावेळी सरकारकडून क्वारंटाईन सेंटरची (quarantine centre) उभारणी केली जात आहे. भोपाळच्या मोतीलाल नेहरु स्टेडियममध्ये १ हजार बेड्सच्या क्वारंटाईन सेंटरची सुरुवात करण्यात आली. हे सेंटर सौम्य ते मध्यम प्रकारची लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांसाठी असून भारतीय जनता पक्ष आणि माधव सेवा केंद्राच्या माध्यमातून याची उभारणी करण्यात आली आहे. (quarantine centre with giant screen for Ramayana broadcast starts in Bhopal)

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते. क्वारंटाईन सेंटरमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रुग्णांचे मन गुंतवून ठेवण्यासाठी एका मोठ्या स्क्रीनवर रामायण आणि महाभारताचे एपिसोड (Ramayana broadcast)दाखवले जात आहेत. शिवाय दररोज योगा सेशनही ठेवले जात आहेत. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

quarantine centre bhopal
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रा.स्व.संघाचे कोविड केअर सेंटर

गरीब लोकांसाठी आणि ज्यांना घरी क्वारंटाईन होणे शक्य नाही अशा लोकांसाठी हे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलय. सेंटरला विविध वार्डमध्ये विभागण्यात आले असून त्यांना स्वातंत्र्य सैनिक आणि प्रसिद्ध व्यक्तींचे नाव देण्यात आले आहे. महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, अब्दुल कलाम, सरदार वल्लभभाई पटेल, राजा भोज अशी नावं वार्डला देण्यात आली आहेत. महिलांच्या वार्डंना रानी लक्ष्मी बाई आणि रानी कमलापती अशी नावं ठेवण्यात आली आहेत.

quarantine centre bhopal
चांगली बातमी! मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

प्रत्येक बेडसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जर पॉईंट, पाणी सुविधा देण्यात आली आहे. ज्यांना श्वास देण्यास त्रास होतोय, अशांसाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पुरवण्यात येत आहेत. रुग्णांचे मन उत्साही रहावे आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी दररोज योगा सेशन ठेवण्यात आले आहेत. एक मोठी स्क्रीन सेंटरमध्ये लावण्यात आली असून त्यावर रामायण, महाभारत मालिका पाहता येणार आहेत. तसेच दिवसभर महामृत्यूंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप सुरु राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com