

From Madhya Pradesh to International Markets: Giant Noorjahan Mango in High Demand
sakal
अलिराजपूर (मध्य प्रदेश): आंब्यांची ‘राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘नूरजहाँ’ जातीच्या आंब्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मध्य प्रदेशातील कठ्ठीवाडा परिसरातील एका बागेत यंदाच्या हंगामात ३.३ किलो वजनाचा नूरजहाँ आंबा तब्बल ३,८०० रुपयांना विकला गेला आहे. या दुर्मिळ जातीच्या काही आंब्यांचे वजन जूनअखेर चार किलोपर्यंत जाऊ शकते, असा दावा उत्पादकांनी केला आहे.